कुकिंग सूचना
- 1
मटण स्वच्छ तीन-चार पाण्याने धुऊन घ्यावे. कांदा, तीळ,खसखस, धने जीरे, खडे मसाले तेल घालून भाजून घ्यावे आणि त्याचे वाटण करून घ्यावे. तसेच आले लसूण सांबाराची पण पेस्ट तयार करून घ्यावी.
- 2
कुकर मध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये जीरे मोहरी,आलं-लसणाची पेस्ट, कसुरी मेथी कांद्याचं वाटणं घालून मिक्स करून घ्यावे. हळद तिखट गरम मसाला आणि प्रमाणात मीठ घालावे.
- 3
सर्व मसाला मिक्स करून तेल सुटेपर्यंत शिजू द्यावे. नंतर मटण घालावे. मटण घातल्यानंतर दहा मिनिटे मसाल्यामध्ये शिजू द्यावे.
- 4
त्यानंतर मटना मध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घालावे. आणि कूकरच्या आठ ते दहा शिट्ट्या काढून घ्यावेत. मटण शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावा.
- 5
तयार आहे आपला मटणाचा रस्सा. हा मटणाचा रस्सा चपाती, भाकरी, किंवा भातासोबत ही छान वाटतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15737600

















टिप्पण्या