कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पास्ता एका बोल मध्ये घ्या. बोल मध्ये पाणी ऍड करून पास्ता पाच ते सात मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. असे केल्याने पास्ता लवकर शिजतो.
- 2
गॅस वर कढई किंवा टोपा मध्ये पाणी गरम करत ठेवा. त्यात थोडेसे मीठ ऍड करा. आता भिजवलेला पास्ता त्यामध्ये ऍड करा. आणि पास्ता शिजवून घ्या.
- 3
पास्ता शिजला की तो पाण्यातून काढून घ्या. आणि थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने पास्ता छान मोकळा होतो.
- 4
कढई किंवा टोपा मध्ये मध्ये बटर गरम करून चिरलेला लसूण,कांदा आणि टोमॅटो बटरमध्ये परतून घ्या. तुम्ही आवडीनुसार कोणत्याही भाज्या ऍड करू शकता. भाज्या पुरतं मीठ ऍड करा. भाज्या परतून झाल्या कि प्लेट मध्ये काढून घ्या.
- 5
एका बोल मध्ये रेडीमेड पास्ता सॉस मिक्स घेऊन त्यात अर्धा ग्लास पाणी ॲड करा. चमच्याने मिश्रण ढवळून घ्या. कढईमध्ये पास्ता सॉसच मिश्रण ओतून मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा.
- 6
नंतर त्यामध्ये शिजवलेला पास्ता आणि परतलेल्या भाज्या ॲड करा.थोडीशी काळीमिरी पूड आणि चीज ॲड करा. पास्ता आणि भाज्या सॉस मध्ये छान मिक्स करून घ्या.
- 7
गरमागरम पास्ता प्लेट मध्ये काढा.आवडीनुसार वरतून चिली फ्लेक्स व मिक्स हब्स घाला. किसलेले चीज घाला. आणि पास्ता सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या