उपवासाचे पॕटिस (Upvasache patties recipe in marathi)
उपवासाचे पॕटिस (Upvasache patties recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सारण करून घेऊयात- १कप ओल खोबर तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात हिरव्या मिरच्या, आल, थोडी कोथिंबीर घालून त्याचे वाटण काही करून घ्या. आणि त्याचे गोळे करून घ्या.
- 2
आता ३ बटाटे उकडून घ्या आता ते मॕशरने मॕश करून घ्या. आता त्यात चवी नुसार मीठ, साबुदाणा पावडर ३ चमचे घालून ते छान मळून घ्या.
- 3
आता त्याची गोलगोल वाटी करून त्यात ते तयार केलेले सारण घालून त्याला पॕटिस सारखा आकार द्या. अशाप्रकारे सर्व तयार करून घ्यावे.
- 4
आता कढईत तेल गरम करून ते तयार करून घेतलेले पॕटिस त्या साबुदाणा पावडरमध्ये दोन्ही बाजुंनी बुडवून घ्या.
- 5
आता ते एक एक तेलात घालून दोन्ही बाजुंनी छान तळून घ्या. आता १ कप दही घेऊन त्यात चवीनुसार मीठ, १ चमचा पीठी साखर घालून ते छान ढवळून घ्यावे.
- 6
अश्याप्रकारे मस्त तिखट गोड (उपवासाचे पॕटिस) तयार आहेत. आता ते गोड दह्यासोबत खाऊ शकता. तर असेच थंडीच्या दिवसांत मस्त खा आणि छान रहा.....
Similar Recipes
More Recipes
- खमण ढोकळा (Khaman dhokala recipe in marathi)
- उपवासाचे साबूदाना, शिघंगाडा पीठ बटाटा पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
- पालक दही कोशिंबीर (Palak dahi koshimbir recipe in marathi)
- राजगिरा पराठा बटाटा भाजी (Rajgira paratha batata bhaji recipe in marathi)
- चिकुचा हलवा (Chikoo halwa recipe in marathi)






टिप्पण्या (5)