फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)

#LOR
#फोडणीचीपोळी
#पोळीचाचिवडा
शिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR
#फोडणीचीपोळी
#पोळीचाचिवडा
शिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पोळी हाताने बारीक तुकडे करून घ्यावी
- 2
नंतर कढईमध्ये तेल गरम करून जीरे व मोहरीचा तडका तयार करावा व त्यामध्ये कांदा घालून परतून घ्यावा
- 3
कांदा थोडासा गुलाबीसर झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता शेंगदाणे व जा एक चमचा जाड पोहे घालावेत पोहे थोडेसे फुले पर्यंत परतून घ्यावे
- 4
नंतर त्यामध्ये हळद तिखट घालून घ्यावे नंतर तयार पोळीचा कुस्करा घालूनमिक्स करावे आणि साखर आणि मीठ घालून घ्यावे घ्यावा आणि मिक्स करून घ्यावे
- 5
झाकण ठेवून एक वाफ आणावी आणि नंतर कोथिंबीर घालून मिक्स करावे
- 6
तयार फोडणीचे पोहे एका प्लेटमध्ये घेऊन त्यावरती थोडासा कच्चा कांदा कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सर्व्ह करावे सोबत लिंबू किंवा ताक किंवा दही द्यावे
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या (2)