चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)

#KS
माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो.
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS
माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साहित्याची जमवा जमव करून घ्या. केक च्या भांड्याला तेल व मैदा लावून घ्या. किंवा बटर पेपर लावून घ्या.
- 2
मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट चे तुकडे करून घ्या. नंतर त्यामध्ये साखर, तेल आणि अर्धा कप दूध ऍड करा. आणि मिक्सरला फिरवून एक पेस्ट तयार करून घ्या.
- 3
आता तयार पेस्ट मध्ये लागेल तसं दूध ऍड करून स्मूथ असं मिश्रण तयार करून घ्या. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर घाला. मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
- 4
गॅसवर कढई पाच मिनिटांसाठी प्री-हीट करण्यासाठी ठेवा. केकच्या भांड्यामध्ये केकचे मिश्रण ओतून घ्या. आणि दोन ते तीन वेळा टॅप करून घ्या. कडे प्री हिट झाली की त्यामध्ये केक वीस मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
- 5
केक थंड झाला की सुरीच्या साह्याने बाजूच्या कडा सोडवून केक प्लेटमध्ये काढून घ्या.
- 6
एका बोल मध्ये चॉकलेट घ्या. चमच्याने गरम दूध ओतून चॉकलेट मेल्ट करून घ्या. आणि चॉकलेट ची पेस्ट तयार करून घ्या. चॉकलेटची पेस्ट केक वर पसरवून घ्या. केकच्या कडांना ड्रायफ्रूट्स किंवा चोको चिप्स लावून केक सजावट करून घ्या.
- 7
आपला घरच्या घरी छान चॉकलेट बिस्कीट खाण्यासाठी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
- चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
- ढाबा स्टाईल मसाला भेंडी (Dhaba Style Masala Bhendi Recipe In Marathi)
- पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
- प्रोटीनयुक्त रवा व्हेजी पॅनकेक (Rava Veggie Pancake Recipe In Marathi)
- सरसो दा साग मक्के दी रोटी (Sarson Da Saag Makki Di Roti Recipe In Marathi)





















टिप्पण्या