डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)

#आजचा नाष्टा डोसा चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 500 ग्रॅम तांदूळ घेऊन, ते चांगले स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुऊन घेतले. आणि त्यात पाणी घालून तांदूळ भिजत ठेवले.
- 2
दुसऱ्या भांड्यात 250 ग्रॅम उडीद डाळ स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुऊन, त्यात पाणी घालून डाळ भिजत ठेवली.
- 3
5-6 तासानंतर तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले. आणि तांदूळ आणि उडीद डाळ एकत्र करून घेतले.
- 4
1/2 तासानंतर तयार केलेल्या पिठाचे डोसे करण्यासाठी घेतले.
- 5
मग एक पॅन गरम करून त्याला ब्रशने तेल लावून त्यावर तयार केलेले डोस्याचे
पीठ घालून, डोसा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले. - 6
आता चटणी साठी अर्धी वाटी नारळ किसून, त्यात 4-5 हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर चवीनुसार मीठ, थोडी साखर घालून, मिक्सर मध्ये चटणी बारीक वाटून घेतली. आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत, आपले गरमा गरम डोसे आणि चटणी. हे डोसे चटणी बरोबर खूप छान लागतात.
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या