डाळव्याचे लाडू

ही माझी 630 वी रेसिपी आहे.
डाळ्या,डाळवं, फुटाण्याची डाळ असे अनेक नावे या डाळीसाठी आहे.
पौष्टिक, पोटभरीचा असा हा लाडू आहे.
डाळव्याचे लाडू
ही माझी 630 वी रेसिपी आहे.
डाळ्या,डाळवं, फुटाण्याची डाळ असे अनेक नावे या डाळीसाठी आहे.
पौष्टिक, पोटभरीचा असा हा लाडू आहे.
कुकिंग सूचना
- 1
डाळ्या मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पावडर करून घेणे. एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे. नंतर काजू घालून त्याची पावडर करून घेणे. ती ही डाळव्याच्या पावडर मध्ये काढून घेणे.
*डाळवं व काजू दोन्ही एकत्र मिक्सरला वाटून घेतले तरीही चालेल. - 2
दोन्ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणे. त्यात गुळाची पावडर व वेलची पावडर घालून व्यवस्थित हाताने चोळून घेणे.
- 3
तयार सारणात थोडे थोडे साजूक तूप घालत व्यवस्थित मिक्स करून घेणे. लाडू वळतील इतपत तूप घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 4
या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेणे.
खाण्यासाठी पौष्टिक लाडू तयार.
*यात आपण बदामची ही पावडर घालू शकतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या