वेेज पुलाव

#तांदूळ
पुलाव हा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि आपल्याला ह्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात. असाच एक साधा, सोपा व कुठल्याही डाळ सोबत किव्वा रस्सा भाजी सोबत खायला छान लागेल असा हा वेेज पुलाव आहे.
वेेज पुलाव
#तांदूळ
पुलाव हा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि आपल्याला ह्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात. असाच एक साधा, सोपा व कुठल्याही डाळ सोबत किव्वा रस्सा भाजी सोबत खायला छान लागेल असा हा वेेज पुलाव आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धुऊन १/२ तास पाण्यात भिजत ठेवा. तोपर्यंत सर्व भाज्या चिरुन घ्या.
- 2
एक पातेलं तापवत ठेवा व त्यात तेल टाका. तेल तापले की त्यात सर्व खडा मसाला घालून परतवून घ्या. लगेच सर्व भाज्या घालून एकजीव करा.
- 3
तोपर्यंत एका बाजूला पाणी तापवत ठेवा. चांगली उकळी येऊ द्या.
- 4
आता भिजवलेले तांदूळ निथळून घ्या व पातेलीत टाका. हलके परतवून घ्या व भाज्या सोबत एकजीव करा.
- 5
चवीपुरती मीठ टाका व उकळलेले पाणी ओता. ढवळून घ्या व थोडे पाणी आटू द्या.
- 6
पाणी साधारण अर्धे झाले की आच कमी करा व झाकण लावून पुलाव शिजू द्या.
- 7
तांदूळ छान फुलले व पाणी आटले की आच बंद करा.
- 8
एका फोडणीच्या कढईत तूप तापवत ठेवा. त्यात काजू थोडे परतवून घ्या व पुलाव वर टाका. चांगले एकजीव करून घ्या.
- 9
हा गरमागरम वेेज पुलाव सांबार, डाळ फ्राय किव्वा आवडीच्या रस्सा भाजी सोबत खायला द्या. बाजूला थंडगार दह्याची कोशिंबीर नक्की वाढा!
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या