वेज कटलेट्स

#न्यूइयर
#teamtrees
#onerecipeonetree
पार्टी म्हंटलं की काही तरी चमचमीत पाहिजेच. व ते आधीच बनवून ठेवता आले तर ऐन वेळी पाहुण्यांना सर्व करणे सोप्पे जाते. हे वेज कटलेट्स आधीच बनवून डीप फ्रीज केले, तर पार्टीच्या वेळी पटकन तळून देता येतात. चवीला मस्तच लागतात व पोटही भरतच! तर मग पाहुया ह्याची कृती.
वेज कटलेट्स
#न्यूइयर
#teamtrees
#onerecipeonetree
पार्टी म्हंटलं की काही तरी चमचमीत पाहिजेच. व ते आधीच बनवून ठेवता आले तर ऐन वेळी पाहुण्यांना सर्व करणे सोप्पे जाते. हे वेज कटलेट्स आधीच बनवून डीप फ्रीज केले, तर पार्टीच्या वेळी पटकन तळून देता येतात. चवीला मस्तच लागतात व पोटही भरतच! तर मग पाहुया ह्याची कृती.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम, अंदाजे ३/४ कप पाणी उकळत ठेवा व त्यात मध्यम आचेवर फ्लॉवर, मटार व गाजर शिजवा व पाणी निथळून घ्या.
- 2
एका पॅन मध्ये तेल तापवून त्यात हिरव्या मिरच्या घाला व त्यावर कांदा टाकून पारदर्शक होईस्तोवर शिजवा. पुढे, आले लसुण पेस्ट घालून चांगले शिजवा.
- 3
त्यात हळद व चिरलेल्या सिमला मिरच्या घाला व काही मिनिटे शिजवा. त्यात उकडलेल्या सर्व भाज्या, लाल तिखट व मीठ घालून एकजीव करा व मोठ्या आचेवर, मिश्रण सुके पर्यंत परतवून घ्या.
- 4
सर्व भाज्या चेचून घ्या व त्यात गरम मसाला घालून एकजीव करा.
- 5
मिश्रण थंड झाले की मग त्यात उकडलेला बटाटा व रताळं, चिरलेली कोथिंबीर व पावाचा चुरा घालून एकजीव करून घ्या.
- 6
गरजेनुसार मीठ घाला व तुमच्या मर्जिच्या आकाराचे कटलेट्स बनवा. साधारण १०-१५ मिनिटे कटलेट्स फ्रीज मध्ये ठेवा, जेणेकरून ते थोडे घट्ट होतात.
- 7
त्यादरम्यान, पीठ व पाणी एकत्र करून घ्या व पातळसा घोळ बनवा. रवा एका पसरट ताटलीत पसरवून घ्या.
- 8
कटलेट्स ह्या घोळात बुडवून मग रव्यात चांगले घोळवून घ्या. ते परत थोडे घट्ट होण्याकरिता २०-३० मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा.
- 9
तव्यावर तेल तापवून त्यात हे कटलेट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत, तळून घ्या व टिश्यू पेपर वर काढून घ्या.
- 10
न्यू इयर पार्टीला हे चविष्ट वेज कटलेट्स टोमॅटो सॉस व हिरव्या चटणी सोबत सर्व करा!
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या (3)