कुकिंग सूचना
- 1
बदाम बारीक चिरून ठेवा. बासुंदी साठी शक्यतो म्हशीचे दुध वापरावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळत ठेवावे. आच मंद ठेवावी. वर जी साय जमेल ती कालथ्याने / पळीने मोडावी. तसेच एखादा कालथा/ पळी उकळत्या दुधात ठेवून द्यावी म्हणजे दुध उतू जाणार नाही. दुध बुडाला लागू नये म्हणून तळापासून कालथ्याने सतत हलवत रहा. दुध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा.
- 2
दुध आटले की त्यात मनुका आणि कापून बारीक केलेले बदाम घालावे. तसेच साखर पण घालावी. अजून १० मिनिटे उकळवा. आणि आच बंद करून वेलची पूड घाला.
- 3
बासुंदी थंड झाल्यावर ती फ्रिजमध्ये ठेवा. फ्रीज मधून बासुंदी काढल्यावर त्यावर जाड साय आलेली दिसेल. ती चमच्याने मोडून बासुंदीत मिसळा आणि बाऊल'मध्ये काढा. थंड किंवा गरम कशीही बासुंदी खाऊ शकतात. पण बासुंदी ही पुरी बरोबरच छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11876225





टिप्पण्या