शेवग्याच्या शेंगांचे सार

वरण, आमटीत तर रोज शेंगा घालतो, जरा वेगळ्या पद्धतीचे हे सार नक्की करून बघा.
#lockdown, #stayathome,
#workfromhome, #let'scook
शेवग्याच्या शेंगांचे सार
वरण, आमटीत तर रोज शेंगा घालतो, जरा वेगळ्या पद्धतीचे हे सार नक्की करून बघा.
#lockdown, #stayathome,
#workfromhome, #let'scook
कुकिंग सूचना
- 1
शेंगांचे २-३"चे तुकडे करून सोलून घ्यावेत. ओला नारळ, जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्यावे. चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढावा.
- 2
तेल तापवून त्यात हिंग, राई, कडीपत्त्याची फोडणी करावी. त्यात शेंगा, हळद व थोडे मीठ घालून शेंगा शिजवून घ्याव्यात. शेंगा शिजल्यावर त्यात वाटण, गूळ, चिंचेचा कोळ घालून, मीठ घालावे. शेंगा शिजताना मीठ घातले असल्याने आता बेतानेच मीठ घालावे..
- 3
एकदा चांगली उकळी आली, की तयार झाले शेंगांचे सार. गरमच भाताबरोबर वाढावे. शेंगात 'अ' जीवनसत्त्व, कॅल्शियम, प्रथिनं, तंतुमय पदार्थ असल्यामुळे, लोह, रक्ताची कमतरता, तसेच इतर रक्तदोषावरील आजारात हे सार अत्यंत गुणकारी आहे. यातील हिरवी मिरची वगळून हे सार बाळंतिणीस दिल्यास तिला स्तनपान व रक्तवाढीस मदत होते.
Keywords
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या