मुगाची खिचडी
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
मुगाची डाळ, तांदूळ स्वछ धुवून घ्यावे. कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्यावा. बटाट्याचे बारीक काप करावेत. अद्रक आणि लसूण ची पेस्ट करून घ्यावी. मिरची बारीक करावी. कोथंबीर स्वच्छ धुवून चिरावी.
- 2
गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकावे. तेल तापले की त्यात जिरे-मोहरीची फोडणी द्यावी. नंतर बारीक चिरलेला कांदा, अद्रक-लसूण पेस्ट आणि मिरची टाकून परतून घ्यावे. त्यानंतर टोमॅटो टाकावा. 1 मिनिट झाकण ठेवून शिजवावे. हळद टाकावी. त्यानंतर मुगाची डाळ, ओला वाटाणा, बटाटे टाकून सर्व पुन्हा एकदा परतावे. त्यानंतर धुतलेला तांदूळ टाकावा.
- 3
एकीकडे दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घ्यावे. हे गरम केलेले पाणी कुकरमध्ये टाकावे. चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकावी. फोडणीमध्ये गरम पाणी टाकल्याने पदार्थांचा रंग आणि चव, दोन्ही टिकून राहते. कुकरच्या 3 ते 4 शिट्या होऊ दद्याव्यात.
- 4
अशा पद्धतीने गरमागरम खिचडी खाण्यासाठी तयार झाली आहे..😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या