मूगडाळीचे लाडू
कुकिंग सूचना
- 1
मूगडाळ मध्यम आचेवर खमंग वास येईपर्यंत कोरडी परता. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
- 2
एका कढईत तूप गरम करा. मूगडाळीचे पीठ मध्यम आचेवर तूपामध्ये खमंग परतून घ्या.
- 3
एका पातेल्यात चिरलेला गूळ घेऊन त्यात निम्मे पाणी घालून मंद आचेवर ठेवा. पाकाला उकळी आली की गॅस बंद करा. पाक थोडा थंड झाल्यावर मूगडाळीच्या पीठात ओता.
- 4
हाताला सोसेल एवढे थंड झाल्यावर त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून चांगले एकजीव करा आणि लाडू वळून घ्या. मूगडाळीचे लाडू खाण्यासाठी तयार!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12398739
















टिप्पण्या