खळगुट (झिरकं) (बट्ट) (khalgut recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week2
गावाकडला पदार्थ म्हटलं की तो थेट मातीच्या गंधा ची आठवण आणि आजोळच्या चुली जवळचा खमंग दरवळ आठवतो .अगदी कमी साहित्यात बनवलेले पदार्थ पण त्याची चव तुमच्या पंचतारांकित पदार्थांना कधीही येऊ शकत नाही..

कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र तयार ठेवून मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची ओले शेंगदाणे लसूण आलं कोथिंबीर इत्यादी चं वाटण तयार करुन ठेवावे व दुसरीकडे कांदा बारीक चिरून ठेवावा
- 2
आता लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून,जिरे मोहरी ची फोडणी घालून, लाल मिरची व कांदा परतायला ठेवावा.कांदा खरपूस लाल झाल्यावर त्यामध्ये वरील वाटण घालावं.
- 3
कांद्यासोबत हे वाटण खरपूस भाजून घ्यावं. काही वेळाने हे वाटण कढईच्या कडांना तेल सोडेल,त्यावेळी आवश्यकतेनुसार पाणी घालावे व चांगल्या सात-आठ उकळ्या येऊ द्याव्यात.खळगुट तयार आहे.
- 4
हे खळगुट लिंबू पिळून गरमागरम भाकरी सोबत किंवा भातासोबत अतिशय चविष्ट लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (19)