शिरा (shira recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 3 नैवेद्य रेसिपी 1
मी ज्या शाळेत शिक्षिका होते तिथल्या एक मॅडम उपासाला भाजणीचे फराळाला करायच्या.रवा हा भाजून घेतलेला असतो म्हणून तो उपासाला चालतो असे त्यांनी सांगितले. आणि गोड नैवेद्य ही होतो.आपल्या महाराष्ट्रात नाग पंचमीच्या भावाच्या उपवासालाही चालते म्हणून मी ही रेसिपी नैवेद्यरेसिपी साठी केली आहे.

कुकिंग सूचना
- 1
कढईत 2 टी स्पून तूप टाकून रवा भाजून घ्या. थोडा खरपूस झाला कि ताटात काढा.
- 2
आता कढईत सगळे तूप ओता. त्यात काजू बदाम अक्रोड आणि केळीचे काप टाकून 1 मिनिट तळा.
- 3
आता रवा टाका 2 मिनिट चांगलं भाजून घ्या.
- 4
एका हाताने कोमट दूध हळू हळू ओततजा व दुसऱ्या हाताने रवा +दूध फिरवा म्हणजे गाठी होणार नाहीत.आणि आता झाकण ठेवा.
- 5
1 मिनिट नंतर साखर घालून फिरवा.
- 6
साखर वितळली कि वेलची पूड ghalun पुन्हा एकदा रवा फिरवून गॅस बंद करा.
- 7
4 ते 5 मिनिटे तसाच झाकुन ठेवा. रवा छान फुलेल.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)