भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#स्टफ्ड #week1
वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी.

भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)

#स्टफ्ड #week1
वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
  1. 4छोटी वांगी
  2. 1मोठी वाटी भाजलेलं सुकं खोबरं
  3. 4-5लसूण पाकळ्या
  4. 1 चमचालाल तिखट
  5. 1टीस्पून हळद
  6. 1 मोठा चमचागोडा मसाला
  7. 1 वाटीकोथिंबीर
  8. 1 इंचआलं
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 1 वाटीतेल
  11. चवीनुसारमीठ
  12. 1/4 वाटीदाण्याचा कूट
  13. थोडी चिंच
  14. 1 मोठा चमचागुळ
  15. पाणी

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    वांगी धूवून घ्या. वांग्यांना दोन्ही बाजूंनी चीर द्या. वांगी मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा म्हणजे काळी पडणार नाहीत. भाजलेले खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, मिरच्या,गुळ सर्व मसाले आणि चवीनुसार मीठ टाकून सरबरीत वाटून घ्या.(गुळ आणि चिंच घातल्याने भाजीला आंबट गोड चव येते आणि वांगी बाधत पण नाही.)वाटणामध्ये शक्यतो पाणी घालू नका. वाटणामध्ये दाण्याचा कूट आणि थोडी कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करा.

  2. 2

    तयार झालेले वाटण वांग्यामध्ये भरून घ्या. कढई मध्ये तेल गरम करा. तेल चांगले तापले की त्यात वांगी सोडा.

  3. 3

    तेल चांगले तापले की त्यात वांगी सोडा. वरती झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवा. थोडी वाफ आली की उरलेले वाटण टाकून परतून घ्या. झाकणावरचे गरम पाणी भाजीत टाकून वांगी शिजवून घ्या. मग गरम गरम भरलेली वांगी भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

Similar Recipes