चाचणी बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)

नैवेद्य
#रेसिपीबुक #week3
नैवेद्याची मानकरीण चणाडाळ आहे .कितीही पक्वान्ने केली तरी पूरण जातेच.
स्वामींना बेसनाचा लाडू अतिप्रिय म्हणून आणि माझ्या ऐहिक गुरून आवडतात म्हणूनही मी चाचणी बेसनाचे लाडू करते.
करू.
चाचणी म्हणजे परीक्षा हे तुम्हाला माहीत आहेच. ज्या सुगरणीने साखरेच्या पाकाला चाचणी हे नाव दिलं असेल ती खरंच हुशार असली पाहिजर किंवा पाकाच्या हटवादीपणाने हटली असावी.मला तो प्रश्न नव्हता.या चाचणीत मी केव्हाच पास झालेय.
याशिवस्य या बेसनासाठी डाळ भिजवून,वाटून घायवी लागते,त्यानंतर तुपावर परतून घाययची असल्याने तूप आणि वेळ भरपूर लागतो बेसन भाजायला. पण मी मुळातच शॉर्टकट्स शोधण्यात तत्पर असल्याने यातही शिधला आहे,वाटलेली डाळ वाफवून नन्तर भाजायची,म्हणजे तूप, वेळ, आणि श्रम कमी लागतात.आणि मोतीचुराच्या चवीचे लाडू तयार होतात.
घ्या तर साहित्य जमवायला.

कुकिंग सूचना
- 1
चाणाडाळ सहा तास भिजवा.
निथळून, मिक्सरमधून पाणी न घातला, दरीदरीत वाटून घ्या. - 2
वाटलेली डाळ कुकरमध्ये वाफवून घ्या.(मी मायकोव्हेव वापरला,ओला नॅपकिन घालून चार मिनिटे शिजवून घेतलं.)
- 3
डाळ थंड झाल्यावर हाताने कुस्करून मोकळी करा.गुठळ्या राहू देऊ नका,मोठ्या भोकाच्या चाळणीने चाळून घ्या.
- 4
तूप गरम करून त्यात डाळ घाला.मंद आचेवर परतत रहा.खाली जळणार नाही याची काळजी घ्या.गुठळ्या राहिलाच तर डाळ भाजताना मोडा.
- 5
डाळ भाजून झाली की तूप सोडू लागते, तसं झाल की साय घालून ढवळून, गॅस बंद कराआणि झाकून ठेवा.
- 6
साखर भिजेल इतके पाणी घालून दोन तारी पाक करा,त्यातच केशरकाड्या घाला.
- 7
पाक तयार झाला की बेसनात ओतुन व्यवस्थित ढवळा.काजू, किसमिस,वेलचीपूड मिसळा.
- 8
थोडे कोमट असतानाच वळा..नैवेद्य दाखवूम प्रसादाचा आस्वाद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या