ब्रेडच्या कडांचा उपमा (bread upma recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

ब्रेडच्या कडांपासून ब्रेड क्रम्बस किंवा अनेक वेगवेगळे पदार्थ आपण सगळे बनवतोच...त्यातलाच एक, मी बऱ्याचदा नाश्त्यासाठी करते तो ब्रेडच्या कडांचा उपमा पोस्ट करत आहे. टाकाऊतून टिकाऊ करायचा महत्त्वपूर्ण संदेश आईकडूनच मिळाला.आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तिचीच शिकवण अमलात आणली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनीटे
  1. 2 कपबारीक चिरलेल्या ब्रेड च्या कडा
  2. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  3. 2 टेबलस्पूनतेल
  4. 2-3 टेबलस्पूनपाणी
  5. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनतिखट
  8. चिमूटभरहिंग
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 2 टेबलस्पूनखवलेल खोबरं
  11. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथींबीर
  12. 1/2 टेबलस्पूनलिंबूरस
  13. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार
  14. 1 टीस्पूनसाखर
  15. 1-2 टेबलस्पूनबारीक शेव...आवडत असल्यास

कुकिंग सूचना

५-७ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    तेल गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग घालून ते तडतडल्यावर त्यात मिरची घालुन परतले.मग चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतला.मग हळद,तिखट घातले.

  3. 3

    नंतर ह्यात ब्रेडच्या कडांचे बारीक कापलेले तुकडे,मीठ,साखर,लिंबूरस, थोडं खोबरं,कोथिंबीर घालून छान मिक्स केले.ह्यावर थोडा पाण्याचा हबका मारून दोन मिनिटे मंद गॅस वर ठेवले.

  4. 4

    गॅस बंद करून त्यात लिंबुरस पिळून बाउल मध्ये काढून घेतले.

  5. 5

    खवलेल खोबरं आणि शेव घालुन,लिंबाच्या फोडीने मस्त सजवून गरम गरम सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes