इडली फ्राय (idli fry recipe in marathi)

#झटपट
इडली सांबर तर सगळ्यांनाच आवडते.एकदा आई कडून इडली जास्त झाली.मग उरलेल्या इडलीचे काय करायचं ? मग काय शिळ्या पोळीला फोडणी देतो तशी दिली फोडणी इडलीला. मस्तच झाली होती आणि टीटाइम नाश्ता पण झाला.

कुकिंग सूचना
- 1
इडलीचे उभे काप करून घ्या.
- 2
कांदा बारीक कापा.
- 3
मिरची व कोथिंबीर कापून घ्या.
- 4
कढईत तेल गरम करायला ठेवा.
- 5
मोहरी टाका.
- 6
मोहरी तडतडली कि जेरे,कढीपत्ता व मिरचीचे काप टाका.
- 7
कांदा टाका.तो गुलाबी होई परियंत भाजा.
- 8
आता त्यात हळद, तिखट, साखर, थोडे मीठ घालून 1 मिनिट परता.
- 9
आता इडलीचे काप घालून हलक्या हाताने परता.1 मिनिट झाकण ठेऊन वाफाळू द्या.
- 10
झाकण काढून इडली फिरवा. पुन्हा 1मिनिट झाकण ठेवा.
- 11
झाकण काढून इडली वरखाली करा आणि गॅस बंद करा.
- 12
वरून कोथिंबीर आणि बारीक शेव फिरवा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या