हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)

पावसाळ्यात गरम गरम व्यंजने खाण्याची मज्जा वेगळीच असते. मी आणि माझा नवरा, आम्हा दोघांना गरमा गरम Chinese खायला भरपूर आवडतं.
हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)
पावसाळ्यात गरम गरम व्यंजने खाण्याची मज्जा वेगळीच असते. मी आणि माझा नवरा, आम्हा दोघांना गरमा गरम Chinese खायला भरपूर आवडतं.
कुकिंग सूचना
- 1
नूडल्स उकळण्यासाठी, एका मोठ्या पातेल्यात, 4-5 कप पाणी आणि एक टेबलस्पून तेल घाला. ते उकळण्यास सुरवात झाली की त्यात नूडल्स घाला आणि पॅकेजच्या सूचनेनुसार शिजवा. यास सुमारे 4-5 मिनिटे लागू शकतात.
- 2
सर्व पाणी काढून टाकावे, शिजवण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी, नूडल्स वर थंड पाणी ओता. नूडल्स चाळणीत काढून बाजूला ठेवा
- 3
वेज हक्का नूडल्स रेसिपी बनविणे:
- 4
कढईत तेल गरम करावे.
आता गाजर आणि कॅप्सिकम घाला. 2-3 मिनिटे हाई फ्लेम वर सौंटे करा - 5
आता कोबी घाला आणि 1 मिनिट saute kara.
भाज्या कुरकुरीत आणि थोडी कच्ची असावी, संपूर्ण शिजवलेले नसावेत. - 6
आता आचे कमी करून सोया सॉस, व्हिनेगर आणि रेड चिली सॉस घाला.
मीठ, मिरपूड घालून मिक्स करा. - 7
आता उकडलेली नूडल्स घालून 1-2 मिनिटे शिजवा.
नंतर स्टोव्ह बंद करा. - 8
मांचुरियन बॉल्स साठी
प्रथम, मोठ्या वाडग्यात गाजर, कोबी, कॅप्सिकम घ्या. त्यात चिरलेली मिरची, आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा, - 9
पुढे २ टेस्पून मैदा, २ टेस्पून कॉर्नफ्लोर घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ तयार करावे.
- 10
आता एक लहान बॉल आकाराचे गोळे तयार करा.
- 11
मध्यम आचेवर गरम गरम तेलात तळून घ्या.
गोळे तपकिरी होईपर्यंत अधूनमधून परतत रहा. - 12
सर्वे मंचूरियन गोळे तळून बाजूला ठेवा.
- 13
मंचुरीयन ग्रेव्ही साठी
- 14
आता मोठ्या कढईत २ टेस्पून तेल गरम करून त्यात शिमला मिरची आणि गाजर घाला आणि 1-2 मिनिटे परतावे. नंतर कोबी घाला आणि 1 मिनिट परता.
- 15
२ टेस्पून व्हिनेगर, २ टेस्पून सोया सॉस, १ टीस्पून रेड चिली सॉस, २ टेस्पून टोमॅटो सॉस, मिरीपुड आणि ¼ टीस्पून मीठ घाला.
त्यात १¼ कप पाणी घाला आणि मध्यम आचेवर उकळवा.
एका छोट्या भांड्यात २ चमचे कॉर्नफ्लोर आणि पाणी घेवून, मिश्रण चांगले मिसळा.
कॉर्नफ्लोर स्लरीमध्ये ग्रेव्ही मध्ये घाला आणि चांगले ढवळा.
ग्रेव्ही जाड होईपर्यंत आणि चमकदार होईपर्यंत उकळणे सुरू ठेवा. - 16
तयार वेज मंचूरियन बॉल घाला आणि मिक्स करावे.
- 17
शेवटी, नूडल्ससह वेज मंचूरियन ग्रेव्ही सर्व्ह करा
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
- चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
- नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
























टिप्पण्या