उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) बाप्पाचा पारंपरिक प्रसाद

#मोदक
हा महाराष्ट्रातला लोकप्रिय पदार्थ आहे. सर्व साधारणपणे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून हे मोदक बनवतात. बनवायला जरा कठीण आहे. पण थोड्या सरावाने मोदक नक्की जमतात.
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) बाप्पाचा पारंपरिक प्रसाद
#मोदक
हा महाराष्ट्रातला लोकप्रिय पदार्थ आहे. सर्व साधारणपणे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून हे मोदक बनवतात. बनवायला जरा कठीण आहे. पण थोड्या सरावाने मोदक नक्की जमतात.
कुकिंग सूचना
- 1
नारळ, गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजवा. घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड घालून गॅस बंद करा. आणि सारण गार करून घ्या.
- 2
उकडीसाठी एका पातेल्यात पावणेचार कप पाणी घ्या.
- 3
पाण्यात चिमूटभर मीठ आणि लोणी / साजूक तूप घालून पाणी उकळा. लोणी घातलं तर उकड छान मऊ होते.
- 4
पाणी उकळलं की त्यात मोदकाचं पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं वाफवा. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवा.
- 5
१० मिनिटांनी उकड गरम असतानाच छान मळून घ्या.
- 6
उकडीचा छोटा गोळा घ्या. आणि हाताची बोटं वापरून त्याची पारी बनवा.
- 7
पारीत १ चमचा सारण घाला. पारीला हलक्या हाताने कळ्या काढा- जेव्हढ्या येतील तेव्हढ्या.
- 8
आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप - कळ्या एकत्र करून मोदकाला नाक बनवा. टीप - अंगठा आणि पहिलं बोट वापरून कळ्या एकत्र करा. त्यावेळी हाताचा पंजा पोकळ असला पाहिजे म्हणजे मोदक चेपणार नाही.
- 9
मोदकाचं नाक जास्त जाड असेल तर थोडी उकड काढून टाकून ते सुबक करा.
- 10
तयार मोदक ओल्या फडक्याखाली ठेवा म्हणजे सुकणार नाही.
- 11
मोदक पात्रात / पातेल्यात पाणी उकळा. मोदक वाफवायच्या ताटलीत पातळ कपडा ओला करून पसरवा.
- 12
प्रत्येक मोदकाचा बेस (बूड) पाण्यात बुडवून ताटलीत ठेवा.
- 13
पाणी उकळलं की ताटली मोदक पात्रात / पातेल्यात ठेवून वाफवून घ्या. मध्यम आचेवर २०-२५ मिनिटं लागतात.
- 14
साजूक तुपाबरोबर खायला द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या