पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
विदर्भ असो किंवा महाराष्ट्र गोड पाहुणचारामध्ये पुरणपोळीचा पाहुणचार मोठा समजला जातो. तसेच नैवेद्यामध्येसुद्धा पुरणपोळीच्या नैवेद्याला खूप महत्व आहे. तेव्हा अशी प्रसिद्ध असणारी पुरणपोळी मला सुद्धा खूप आवडते. आणि हो आपली पुरणपोळी परदेशात सुद्धा तेवढीच फेमस आहे बरं का ! चला मग बघुयात कशी करतात ती.😊

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चण्याची डाळ पाच-सहा तास भिजत घालावी. त्यानंतर स्वच्छ धुऊन कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईस्तोवर शिजू द्यावी. शीजल्या नंतर बाहेर काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.
- 2
आता या बारीक केलेल्या चण्याच्या डाळीला एका पॅन मध्ये टाकून, त्यामध्ये साखर, थोडेसे मीठ टाकून छान पाकास येऊ द्यावी. साखर टाकल्यावर पाणी सुटेल व ती पातळ होईल. तेव्हा त्याला सिम गॅसवर परतत रहावे. बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. आणि घट्ट येईस्तोवर मध्ये मध्ये चमचा घोटत राहावा. आणि नंतर त्यामध्ये जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकावे. मग पुरण थंड झाल्यावर त्याच्या पोळ्या करायला घ्याव्यात.
- 3
आता कणीकेमध्ये चिमूटभर मीठ टाकून कणीक मळून घ्यावी. कणकेचा छोटासा गोळा घेऊन लाटून त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकून पॅक करून पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर तेल किंवा तूप टाकून खमंग अशी दोन्ही साईडने शिजू द्यावी.
- 4
गरमा गरम पुरण पोळीवर तूप टाकून दुधा बरोबर देवाला नैवेद्य दाखवून खायला घ्यावी. मस्त टेस्टी लागते.👌👌😋😊
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या