उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#रेसिपीबुक #week10
#मोदक

उकडीचे मोदक हा केवळ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नव्हे, तर अनेकांसाठी उकडीचा मोदक पाहून त्यावर ताव मारण्याचा मोह आवरता येत नाही. गणपती बाप्पाचा कोणताच सण मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात इतर कोणत्याही स्वरूपात मोदक मिळत असले तरीही घरगुती उकडीचे मोदक गणेशोत्सवात नक्की केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक अणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे अहाहा ! मग डाएटच्या भीतीपोटी तुम्ही यंदा मोदकांपासून दूर राहत असाल तर हा सल्ला नक्की वाचा. कारण आरोग्याच्या दृष्टीनेही उकडीच्या मोदकांची चव चाखणं आरोग्याला फायदेशीर आहे.

उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक

उकडीचे मोदक हा केवळ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नव्हे, तर अनेकांसाठी उकडीचा मोदक पाहून त्यावर ताव मारण्याचा मोह आवरता येत नाही. गणपती बाप्पाचा कोणताच सण मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात इतर कोणत्याही स्वरूपात मोदक मिळत असले तरीही घरगुती उकडीचे मोदक गणेशोत्सवात नक्की केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक अणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे अहाहा ! मग डाएटच्या भीतीपोटी तुम्ही यंदा मोदकांपासून दूर राहत असाल तर हा सल्ला नक्की वाचा. कारण आरोग्याच्या दृष्टीनेही उकडीच्या मोदकांची चव चाखणं आरोग्याला फायदेशीर आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
11 सर्विंग
  1. 300ग्रॅम तांदळाचे पीठ
  2. 1/2नारळ (खवून घेणे)
  3. 150ग्रॅम गूळ (organic)
  4. 1आणि 1/2 कप पाणी
  5. 1चमचा साजूक तूप
  6. 1चिमूट मीठ
  7. 1चमचा वेलची पूड,
  8. 2चमचा बारिक कापलेले बदाम-पिस्ता आवडी प्रमाणे

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका भांड्यात पाणी घेऊन उकळी घ्यावी. तायात तूप व मीठ घालुन उकळी आणणे.

  2. 2

    पाण्यात तांदळाचे पीठ घालून एकत्र करावे व 5 मिनिटे झाकण देऊन एक वाफ द्यावी. ह्याला उकड असे म्हणतात.

  3. 3

    15/20 मिनिटांनी उकड थोडी थंड झाली की एका परातीत काढून घेऊन चांगली मळून घ्यावी. ह्याला खोय म्हणतात.

  4. 4

    दुसर्या भांड्यात 1चमचा तूप घ्या व त्यात नारळ घालून परतून घ्या.

  5. 5

    त्यात गूळ, वेलची पूड, बदाम-पिस्ता घालून एकजिव करावे. ह्याला चोय / सारण म्हणतात.

  6. 6

    लिंबा पेक्षा थोडा लहान गोळा करावा व तूपाचे बोट घेऊन मध्ये खड्डा करावा व सर्व बाजूनी पसरवून त्याची पारी करावी.

  7. 7

    ह्या पारी मध्ये चोय भरावी व पारी ला चिमटी मध्ये धरून त्याच्या खिडक्या कराव्यात. सर्व खिडक्या झाल्या की दुसर्या हाताने त्यांना एकत्र आणाव्या व मोदक वरून निमुळता करत जात व्यवस्थित बंद करावा.

  8. 8

    मोदक पात्राच्या जाळीला तूप लावावे किंवा केळी/हळदी चे पान जाळी वर ठेवून सर्व मोदक त्यात रचावे व 15 मिनिटे वाफ घ्यावी.मोदक पात्र थंड झाले की मोदक एका ताटात काढून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा.

  9. 9

    उकडीच्या मोदक खाण्याचे फायदे
    वजन घटवण्यास मदत -
    वजन कमी करायचं मग गोड टाळा असा सल्ला दिला जातो पण मोदक त्याला अपवाद आहे. मोदकामध्ये फॅट्स, आवश्यक पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी असतो. उकडीच्या मोदकाने पोट आणि मनही शांत राहण्यास मदत होते.

  10. 10

    ग्ल्यायस्मिक इंडेक्स कमी -
    मोदक हा तांदूळ, खोबरं, गूळ यांच्या मिश्रणाने बनवलेला असतो. यावर तूपाची धार असते. त्यामुळे मोदकाचा ग्ल्यास्मिक इंडेक्स कमी असतो. उकडीच्या मोदकाचे प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये चढ - उतार होण्याचा धोका कमी असतो.

    कमी कोलेस्ट्रेरॉल -
    उकडीच्या मोदकामध्ये कोलेस्ट्रेरॉल कमी प्रमाणात असते. नारळ आणि सुकामेवा यामधील आरोग्यदायी घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढवतात.

  11. 11

    रक्तदाब आटोक्यात -
    नारळामधील काही घटक हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करतात. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही फायदेशीर ठरतात.
    सांधेदुखी -
    गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तूप हे प्रभावी औषध आहे. मोदकामध्ये तूपाचा समावेश असल्यास सांध्याच्या दुखण्याचे त्रास आणि आर्थ्राईटीसच्या समस्या आटोक्यात ठेवण्यात मदत होते.
    पोटाचे आरोग्य सुधारते -
    बद्धकोष्ठतेसारख्या समस्येचा त्रास कमी करण्यास उकडीचे मोदक फायदेशीर आहेत. मोदकातील पुरणामध्ये तूप असते. यामुळे आतड्यांजवळील घातक, टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes