चाॅकलेट आलमंड नानखटाई (chocolate almond nankhatai recipe in marathi)

चाॅकलेट आलमंड नानखटाई (chocolate almond nankhatai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात कणीक बेसन व रवा घ्यावे.
- 2
त्यात बेकिंग पावडर व कोको पावडर ऍड करून मिश्रण मिक्स करून घ्यावे.सोबतच पिठी साखर व तूप घालावे.
- 3
तूप घातल्यानंतर मिश्रण परत मिक्स करून घ्यावे व त्यात थोडे थोडे दूध ऍड करून मिश्रणाचा घट्ट गोळा करून घ्यावे.गोळा तयार झाल्यानंतर त्यात बदामाचे बारीक काप घालून परत मिक्स करून घ्यावे.एक छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन त्याला कुकी शेप द्यावी.
- 4
मायक्रोवेव्ह ओव्हन चा तवा घेऊन त्याला तुपाने ग्रिसिंग करून घ्यावे व त्यावर बनवलेले कुकीज ठेवावे.
कुकीज वरती अर्ध्या बदामाच्या कापाने डेकोरेट करावे.
मायक्रोवेव 180°c वर या नानखटाई ला तीन मिनिटे बेक होऊ द्यावे.
तीन मिनीटानंतर एकदा चाकूने चेक करावे व चाकुला काही बॅटर न लागल्यास आपल्या नानखटाई रेडी आहे.
तव्यावरून काढून एका सर्विंग डिशमध्ये नानकटाई सजवून घ्यावे. - 5
तयार आहे आपली ताजी ताजी चॉकलेट आलमंड नानखटाई.
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या