रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
माझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी.
रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
माझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात रवा, मैदा,ऑरेंज फुड कलर यामध्ये दही टाकून मिक्स करून घ्यावे.
- 2
थोडं पाणी टाकून घेणे.जिलेबीच बॅटर आपल्याला खूप पातळ व खूप घट्ट पण नको. जिलेबी व्यवस्थित गोलाकार पडल्या पाहिजे. त्यानुसार त्यामध्ये पाणी मिक्स करावे. आणि अर्धा तासासाठी झाकून ठेवावे. जेणेकरून रवा छान भरून जाईल.
- 3
रवा छान मुरेल तोपर्यंत आपण जिलेबी साठी लागणारा पाक तयार करून घेऊया. एका भांड्यामध्ये साखर टाकून त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्यावा. पाक तयार झाला की त्यामध्ये अर्ध नींबू विलायची पावडर टाकून द्यावी. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवावे.
- 4
जिलेबी साठी लागणारे तेल हे चांगलं गरम असावे. आता आपल्या जिलेबीच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर टाकून मिक्स करून घ्यावे. आता या बेट रला सॉसच्या बॉटलमध्ये किंवा पायपिंग बॅग मध्ये भरावे.
- 5
आता एक थेंब बॅटर टाकून बघावे तेल गरम झालं की नाही. वर आलेला दिसल की समजावे आपलं तेल छान गरम झालेल आहे. त्यानंतर त्यामध्ये गोलाकार छान जिलेब्या तळून घ्याव्यात. जीलेबी तळून झाल्या की, डायरेक्ट पाकामध्ये टाकाव्यात. आपला दुसरा जिलेबीचा घाणा तयार झाला की आधी पाकामध्ये टाकलेल्या जिलेब्या प्लेटमध्ये काढून घ्याव्यात. आपली गरमागरम जिलेबी खाण्यासाठी तयार आहेत. तर नक्की करून बघा.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या