चिंबोरी रस्सा (crab gravy recipe in marathi)

#GA4 #week4
#Gravy
खाण्याविषयी प्रेम असणाऱ्या माणसांचे सामान्यतः दोन प्रकार दिसुन येतात. पहिला प्रकार असतो 'हौशी खवय्ये'. जे एखादी वेगळी, एखादी प्रसिद्ध डिश शोधुन ती खाताना आपल्याला दिसतात. आणि दुसरा प्रकार असतो 'दर्दी खवय्ये'. ज्यांना नेमक्या जिन्नसांची आणि पाककृतींची जाण असते. 'दर्दी खवय्ये' नेमक्या वस्तूच्या शोधात बाजार पालथा घालतात. त्या खास जिन्नसांसाठी ओळखी बनवतात. वेळात वेळ काढून साग्रसंगीत ती रेसिपी बनवतात आणि त्याचा मनसोक्त आस्वाद घेत त्या मागची जमवाजमव करण्याची धडपड सार्थकी लावतात. अशी 'दर्दी खवय्यांनी' तृप्त होत, आस्वाद घेत, साजरी करण्याची डिश म्हणजे "चिंबोरीचा रस्सा'!"!
आमच्या परिसरातील खाडी क्षेत्रात सापडणारे 'मड क्रॅब', यांना 'चिंबोरी' म्हटले जाते. कोकणात यांना प्रेमाने 'कुरल्या' म्हणतात. काही लोक त्यांना खेकडे म्हणतात, पण खेकडे म्हणताच पावसात भाताच्या शेतात आढळणारे पांढरे खेकडे डोळ्यापुढे येतात. त्या मुळे आम्ही यांना आदराने चिंबोरीच म्हणतो. त्या भरलेल्या असल्यास (कवचाच्या आत जास्त गर असल्यास) उत्तम! त्या चांदण्या रात्री घ्याव्या की अमावास्येच्या जवळच्या तिथीला घ्याव्या या बाबत दर्दी खवय्यांमधे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मी कोळीण मावशीवर विश्वास ठेऊन घेते.
चिंबोऱ्या घेताना त्या जिवंत असाव्या. त्यांच्या नांग्या अनुभवी व्यक्तीने तोडाव्या. नांग्या आणि पाय काढल्यावर मुख्य कवचाच्या खालील त्रिकोणी भाग काढून माती असल्यास धुवून घ्यावी. मुख्य भागाचे दोन भाग करावे. कवच काढू नये, चव जाते. भरल्या चिंबोऱ्या करताना ते काढून पुन्हा लावावे लागते, पण ती रेसिपी पुन्हा कधीतरी सांगेन. आजसादर आहे 'दर्दी खवय्ये' ज्यावर जीव ओवाळून टाकतात तो 'चिंबोरीचा रस्सा'!

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिम्बोऱ्या स्वच्छ धुवून कापून घ्याव्यात. चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. कांदा खोबऱ्याचे वाटण तयार करून घ्यावे.
- 2
आता एका pan मध्ये तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यावा. त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात बेसन घालून मिनिटभर परतून घ्यावे.
- 3
नंतर त्यात कांदा खोबऱ्याचे वाटण घालावे. छान तेल सुटेपर्यंत परतत राहावे. त्यात वाडवळी मसाला, हळद, हिंग व गरम मसाला घालून पुन्हा छान एकत्रित करून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. थोडे पाणी घालून उकळवून घ्यावे.
- 4
आता त्यात साफ केलेल्या चिम्बोऱ्या घालाव्यात आणि नीट मिक्स करून घ्यावे. १५-२० मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. चिम्बोऱ्या शिजल्यावर त्यात आमसुले घालून ५ मिनिटे अजून उकळवून घ्यावे. कोथिंबीरीने गार्निश करावे!!! गरमागरम चिम्बोरीचा रस्सा तय्यार!!
- 5
गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावा चिम्बोरीचा रस्सा...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या