मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र #मिसळ पाव
#मिसळपाव....बस नाम ही काफी है...
कां,कधी,कशाला...असं फुटकळं प्रश्न इचारु नगा बाबांनु...मी काय उत्तर द्यायाची नाय..कसं असतं नं आपलं....आली लहर अन केला कहर
प्वोटात भुकेचा आगडोंब उसळला असलं त्याच टायमाला हून जाऊदे... म्हंजे भुकेच्या आगीला भन्नाट,,सैराट🌶️,झिंगाट,🤩 तेजतर्रार#मिसळीची आग फस्सक्लास काम करील
काय म्हनता..लागली व्हयं भूक..मंग चला बिगी बिगी... आन् हान सख्या हरी..कान कान कान माझ्या वडिलांचे अस्सल सातारी वाक्य हाय लेकोनिवांत हुद्या..मिसळपावा संगट मायंदाळ कांदा कोथिंबीर फरसाण चिवडा दिलाय बगा..ती तर्री तर नाद खुळाच..तिच्या निस्त्या वासानं आन् रंगानं मिसळीच्या आगमनाची वर्दी पोचेलच बगा टकुर्यात (मेंदू मध्ये)...आई शप्पत पोचली म्हनताय..आंग आक्षी..करा सुरुवात आन् घ्या पयला घास..दिली नव्हं जीभेनं सलामी...मिसळीच्या झणक्यानं दिला का नाय दणका..त्ये पहा तुमच्या नाकातोंडातून पाणी वहाया लागलं,त्ये तुमचं नाक कान तापून लाल लाल झाल्यात..त्यो घाम बघा कपाळावर..पार घाम काढला वो तुमचा..आरं बाबानु याचा अर्थ म्हंजी आपली मिसळ जीभेवरुन खाली उतरुन थैमान घालतीया समद्या शरीरामंदे..काय म्हनता आता मी बोलू नगं ...चालतंय की..पर तुमचं चालू द्या बर्रका..पार तुमचं मन आत्मा तुरुप्त होईपत्तुर खावा...
अशी ही जिव्हा ,मन,आत्मा तृप्त करणारी, संपल्यावरही बोटांवर आपल्या वासातून रेंगाळणारी मिसळ रांगड्या महाराष्ट्राची शान आहे..आणि मिसळीचे देखील हेच रांगडेपण पुनः पुन्हा आपल्याला तिच्याकडे चुंबकाप्रमाणे आकर्षित करते..चला तर मग मिसळीला हे रांगडेपणं कसं प्राप्त होतं ते पाहू या...

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बारीक मटकी स्वच्छ धुऊन आठ तास पाण्यात भिजत ठेवा नंतर चाळणीत उपसून ठेवा. आणि त्यावर झाकण ठेवा. आठ-दहा तासाने चांगले मोड आलेले दिसतील. आता ही मोड आलेली मटकी कुकर मध्ये घाला, त्यात पाणी आणि चिमूटभर हळद घालून दोन शिट्ट्या काढून घ्या.आपल्याला मटकी फार मऊ शिजवून घ्यायची नाहीये.
- 2
एकीकडे आलो मिरची लसूण पेस्ट करून घ्या. दोन कांदे दोन टोमॅटो बारीक चिरून घ्या. राहिलेले दोन कांदे अगदी बारीक चिरून ठेवा. हे कांदे आपल्याला मिसळीवर वरून घालायचे आहे. कोथिंबीरही चिरून ठेवा.
- 3
बारीक चिरलेल्या कांदा टोमॅटोची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्या.
- 4
आता कढई तापत ठेवा. त्यात तेल घाला. तेल तापल्यावर त्यात मोहरी जिरं हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या.आता यात कडिपत्ता घाला. नंतर या मध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट घालून चांगले परतून घ्या
- 5
मग यात आलं मिरची लसूण पेस्ट घाला आणि व्यवस्थित परतून घ्या थोड्यावेळ झाकण ठेवून 2-3वेळा वाफा काढाव्यात.नंतर यामध्ये लाल तिखट,काश्मिरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला,गोडा मसाला घालून मिश्रण व्यवस्थित परतून घेणे आणि त्याला परत दोन-तीन वाफा काढणे. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर,गूळ घालणेआणि मिश्रण व्यवस्थित परतून घेणे.
- 6
वरील मिसळीच्य मिश्रणाला तेल सुटू लागले की त्यामध्ये चार ते पाच कप गरम पाणी घाला. पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी-जास्त करू शकता. आता मीठ घालावे. आणि हे मिश्रण खळखळून उकळून घ्यावे.
- 7
ही झाली आपली तर्री तयार.. यातील थोडी तरी बाजूला वाडग्यात काढून ठेवा, आता यात शिजवलेली मटकी घालून उसळ व्यवस्थित एकजीव करून घ्या. आणि झाकण ठेवून तीन-चार वाफा काढाव्यात. नंतर यात कोथिंबीर घालून उसळ परत ढवळून घ्यावी.ही झाली आपली मिसळीची उसळ तैय्यार..
- 8
एका डिशमध्ये बाऊल ठेवावेत.त्यामध्ये मटकीची उसळ,शेव फरसाण,कांदा कोथिंबीर, लिंबू,तर्री,घालून ठेवावी..सोबत ताक,एखादा गोड पदार्थ देऊन डिश सर्व्ह करावी..
- 9
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (6)