ऊपासाची शेंगदाणे आमटी (shengdanyachi aamti recipe in marathi)

Bhaik Anjali @cook_19425386
ऊपासाची शेंगदाणे आमटी (shengdanyachi aamti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य तयार ठेवावे.मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे कूट,मिरच्या आल्याचे तुकडे, मीठ,थोडेसे जीरे व थोडे ताक घेऊन मिश्रण वाटून घ्यावे.
- 2
आता भांड्यामध्ये तेल किंवा तूप गरम करावे. त्यामध्ये जिर्याची फोडणी करावी व जीरे तडतडल्यावर शेंगदाण्याचे वाटण त्यामध्ये सोडावे. चांगले परतून दोन ते तीन मिनिट होऊ द्यावे.
- 3
थोड्यावेळाने मिश्रणातून तेल सुटेल. आता त्यामध्ये साखर घालावी व उरलेले आंबट ताक सोडावे.आंबटपणा आपल्या आवश्यकतेनुसार ठेवावा. पाच-सहा उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करावा.उपासाची आमटी तयार आहे. साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे यांच्या सोबत अतिशय उत्तम चवीला लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14140591










टिप्पण्या (2)