साऊथ इंडियन वेडिग स्टाईल रस्सम/रस्सम (rasam recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#GA4 #week12
#किवर्ड- रस्सम/ रस्सम

रस्सम/रस्सम हा पदार्थ दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतील लोकप्रिय पदार्थ असून,गेल्या अनेक शतकांपासून हा पदार्थ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये घरोघरी अगदी दररोज बनवला जातो.
'रस्सम ' या शब्दाचा अर्थ रस असून या चमचमीत पदार्थाचे सेवन भातासोबत, तर कधी सूपप्रमाणे पिऊन केले जाते‌.
हा पदार्थ पचण्यासही हलका असल्याने याचा उल्लेख अलीकडच्या काळात 'सुपरफुड' असा करण्यात आला आहे..👏👏😊
चिंचेचा कोळ, टोमॅटो हे रस्सम मधील मुख्य घटक आहेत.
धणे,काळिमिरी,जीरे, तूरडाळ,सुक्या मिरच्या, कडिपत्ता हे या पदार्थाचे सुपर हिरो आहेत.या मसाल्यामुळे रस्सम खूप चवदार बनते.
चला तर पाहू अशीच एक चवदार रस्सम रेसिपी..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ ते ५ जणांसाठी
  1. 1 कप शिजवलेली तूरडाळ
  2. 1 कप चिंचेचं पाणी
  3. 1/2 कप कडिपत्ता
  4. 1 टेबलस्पून ओलं खोबरं
  5. कोथिंबीर
  6. 5 ते ६ लसूण पाकळ्या ठेचलेल्या
  7. 1 टीस्पून हळद
  8. मीठ चवीनुसार
  9. मोहरी
  10. हिंग
  11. तेल फोडणीसाठी
  12. 3 कप पाणी
  13. गुळाचा खडा
  14. 1टोमॅटो चिरून
  15. रस्सम मसाल्यासाठी
  16. 1टेबलस्पून धणे
  17. 1 टीस्पून काळिमिरी
  18. 1 टीस्पून जीरे
  19. 5 ते ६ सुक्या लाल मिरच्या
  20. १ टेबलस्पून तूरडाळ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    रस्सम मसाल्याचे सर्व पदार्थ खमंग भाजून घ्या.त्यात १० ते १२ कडिपत्याची पाने सुद्धा खमंग भाजून घ्या.

  2. 2

    मिक्सरमधे याची बारीक पूड करा.

  3. 3

    गॅसवर पातेले गरम करून त्यात टोमॅटो,लसूण,हळद,मीठ,गूळ कडिपत्ता,चिंचेच़ पाणी घालून ३ कप पाणी घाला मिक्स करून २० मि.उकळू द्या.

  4. 4

    नंतर त्यात तुरीची डाळ घाला.मिक्स करून ३ मि.उकळू द्या.

  5. 5

    नंतर त्यात २ टेबलस्पून रस्सम मसाला पावडर,मीठ चमचे घालून मिक्स करा.५ मि.शिजू द्या.

  6. 6

    आता त्यात ओलं खोबरं, कोथिंबीर घाला.फोडणीपात्र गरम करून त्यात कडिपत्ता,मोहरी,हिंग मिरच्या घालून फोडणी रस्सम मधे ओतून मिक्स करावे. झाले आपले चवदार रस्सम तयार...😋 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes