चिली एग लाजवाब (chilli egg laajwab recipe in marathi)

#worldeggchallenge
चिकन ऐवजी अंड्यांचा वापर करून ही रेसिपी तयार केली आहे. अपेक्षेपेक्षा खुप टेस्टी झाली ही रेसिपी.
चिली एग लाजवाब (chilli egg laajwab recipe in marathi)
#worldeggchallenge
चिकन ऐवजी अंड्यांचा वापर करून ही रेसिपी तयार केली आहे. अपेक्षेपेक्षा खुप टेस्टी झाली ही रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊल मध्ये अंडे फोडून टाकावे. त्यात मिठ व लाल रंग टाकून चांगले फेटून घ्यावे.
- 2
ब्रेड चे छोटे छोटे चौकोनी काप करावे. हिरवी मिरची व सोललेले लसून चॉपर मधून बारीक करून घ्यावे.
- 3
गॅस वर कढई ठेवून त्यात तळण्याकरीता तेल टाकावे. ब्रेड चे काप फेटलेल्या अंड्यात टाकावे. मिक्स करून घ्यावे व मध्यम ऑचेवर तळून घ्यावे. टिशू पेपर वर काढून घ्यावेत.
- 4
कांदा व शिमला मिरची मोठ्या आकारात कापून घ्यावी. गॅस वर कढई ठेवून त्यात एक टेबलस्पून तेल टाकावे. नंतर त्यात चॉपर केलेले लसून व मिरची टाकावी. परतून घ्यावे. चिरलेला कांदा व शिमला मिरची टाकावी, पाच मिनीटे शिजवून घ्यावे, टोमॉटो सॉस, चिली सॉस, व शेजवान चटनी टाकावी. पाच मिनीटे परतून घ्यावे. तळलेले ब्रेड काप मिक्स करून घ्यावे.
- 5
एका प्लेट मध्ये हे मिश्रण काढून घ्यावे. त्यावर चिज पसरवून घ्यावे. माइक्रोवेव मध्ये 80W वर दोन मिनिट होवू द्यावे. चिज वितळून जाईल. टेस्टी टेस्टी चिली एग लाजवाब सर्व्ह करण्यास तयार आहे. गरम गरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या (2)