तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaychi amti recipe in marathi)

#GA4 #week13
Tuvar हा की वर्ड ओळखून ही रेसिपी करतेय.
तुमच्या साठी थेट शेतात जाऊन आणल्या की हो ह्या तुरीच्या शेंगा. तसे मी शेंगा घरी आल्या की बाकी जसे करतात तसेच त्याचे बाळंतपण करते.. कचोरी, पराठे,आमटी,भाजी इत्यादि इत्यादि. पण हे घरी आणलेले तुरी च्या झाडाची पेंडी वळवून तुराटी म्हणून संबोधतात.. ह्या तुराटी मी रंगवून घर सजावटी साठी वापरते.. असा पुर्ण उपयोग करते...ते असू द्या हो.. चला आधी रेसिपी करुन घेऊ..

कुकिंग सूचना
- 1
तुरीच झाड त्याला लागलेल्या हिरव्या तुरीच्या शेंगा.त्या सोलून त्याचे दाणे काढलेत.. कढईत किंचीत तेल घालुन हे दाणे त्यात एक दोन मिनिट परतून घ्या.
- 2
परतलेले दाणे थंड झाले की मिक्सर च्या पॉट मधे घेउन त्यात लसुण कळ्या व अद्रक घालुन व थोडे पाणी घालुन फिरवून घ्या दर्दरीत किंवा तूम्हाला बारिक पेस्ट हवी असेल तसे (मी बारिक पेस्ट केली) आत्ता कढईत तेल घेउन त्यात मोहरी जीरे हिंग मीरची कढीपत्ता हळद व तिखट घालुन परता व त्या मधे तुरीच्या दाण्याची केलेली पेस्ट घालुन परता.
- 3
आत्ता ह्या परतलेल्या पेस्ट मधे तुम्हाला आमटी जितकी पातळ हवी असेल तितके कोमट पाणी घालून छान मिसळावे (आमटी थंड होत आली की दाट यायला लागते) पतळ्सर आमटी मधे धणे जीरे पुड,आमसूल, गूळ घालुन छान उकळून घ्या. व पोळी किंवा भाकरी व हिवाळा असला की तोंडी लावायला भरपुर काही असते ते सोबत देऊन सर्व्ह करावे गरम गरम तुरीच्या दाण्याची आमटी (इथे मी आमटी सोबत मुळा, कांदा, भाजलेलि मिरची,पापड व गुळ्चट असलेले तुरिचे दाणे)
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या