हुरडा ऊपमा (hurda upma recipe in marathi)

Bhaik Anjali @cook_19425386
हुरडा ऊपमा (hurda upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम हूरडा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यावा. ईतर सामुग्री तयार ठेवून, पॅनमध्ये तेल गरम करून जिरेमोहरी फोडणी दिल्यावर चिरलेली मिरची व कढीपत्ता पाने घालावी.
- 2
आता पॅनमध्ये चिरलेली कांद्याची पात घालुन जरा होऊ द्यावी. तोपर्यंत हुरडा मिक्सरवर भरडून घ्यावा. कांद्याची पात तेलावर नरम झाल्यावर त्यामध्ये हळद,तिखट,मीठ घालुन थोडे परतुन हुरड्याची भरड एड करावी. एकसारखे परतवुन लिंबाचा रस व साखर घालुन पुन्हा एकसारखे परतवुन वाफेवर होऊ द्यावे.
- 3
साधारण दोन तीन मिनिट वाफवल्यावर ऊपमा छान मऊ होतो. त्यावर चिरलेली कोथिंबीर घालुन ताज्या दह्यासोबत सर्व्ह करावे..
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14330248











टिप्पण्या (7)