पिठले आणि भाकरी (pithle and bhakhri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
परातीत ज्वारीचे पीठ द्यावे. नंतर त्यामध्ये गरम पाणी घालून चांगले मळून घ्यावे.
- 2
मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यावा. परातीत थोडे पीठ घेऊन त्यावर एक गोळा ठेवावा. नंतर हातानेच थापटून घ्यावी व चपाती एवढी करावी व तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्यावी.
- 3
एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे कांदा व कढीपत्त्याची पाने घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये हळद, मीट व कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालावे.
- 4
मसाला सगळे व्यवस्थित भाजून झाल्यावर त्यामध्ये थोडे पाणी घालावे व पाच मिनिटे शिजू द्यावे.
- 5
एका बाऊलमध्ये बेसन घालून त्यामध्ये पाणी घालावे. पीठ चांगले मिक्स करावे गुठळ्या होउ देउ नये. नंतर तयार बेसनाचे मिश्रण त्या मसाला मध्ये घालावे. चांगले मिक्स करावे. घट्टसर शिजवून घ्यावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14373330















टिप्पण्या