तिळाचे लाडू (teelache ladoo recipe in marathi)

तिळाचे लाडू (teelache ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे भाजून घ्या नि थंड झाले कि कुट करून घ्या. तिळ थोडे गुलाबी सर मंद गॅसवर भाजून घेणे.खोबरे किसून भाजूनघ्या.तिळ,खोबरे,शेंगदाणे कुट,वेलचीपुड, जायफळ पूड एकत्र मिसळून घ्यावे.
- 2
गुळ थोडा बारीक करा त्यात 2टेबलस्पून पाणी घाला नि गॅसवर पाक करण्यास ठेवा.गुळ वितळला कि त्यात तुप व साखर घाला नि गोळीबंद पाक करा.साखर घातली कि लाडू चकचकीत दिसतात नाही घातली तरी चालते.
- 3
पाक कसा बघावा झाला कि नाही...एका वाटीत पाणी घ्या नि पाक एक थेंब टाकून बघा तो विरघळला तर नाही झाला पाक झाला कि आपण पाण्यात टाकला तर टक असा आवज येतो हातात घेतला तर घट्ट लागतो. साधारण पाक व्हायला 15/20मिनीटे लागतात.दुसर्या ताटलीतील लाल रंग आहे तो पाक झाला आहे.
- 4
पाक करताना सतत ढवळत रहा.पाक तयार झाला आहे त्यामधे सर्व मिश्रण घाला नि मिसळून घ्या नि पटापट लाडू वाळा.
- 5
लाडू तयार आहेत नैवेद्य दाखवा नि मग हवे तेवढे खा बर.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या