पालक ठेपला (palak thepla recipe in marathi)

#GA4#week20#ठेपला
ठेपला हा किवर्ड ओळखून पालक ठेपला करत आहे. ठेपला दुधी,मेथी,पातीचा कांदा अश्या अनेक भाज्या पासून बनविता येतो. ठेपला हा गुजराथी लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. आपण ठेपल्याला थालीपीठ किंवा पराठा म्हणतो.
मी पालक चा ठेपला वेगवेल्या प्रकारचे पीठ मिक्स करून केलेला आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक तोडून दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुवावी. आणि चाळणीत ठेवावी. आणि पालक बारीक चिरून घ्यावी.
- 2
पालक मध्ये कोथिंबीर आणि मिरची टाकून मिक्सर मधून बारीक पेस्ट करावी. एका कढईत तेल टाकून तेल गतान करायला ठेवावे आणि तेलाचे मोहन करावे.
- 3
पराती मध्ये कणीक,तांदळाचे पिठ,बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ,चकलीची भाजणी, उडीद डाळीचे पीठ,पालक प्युरी, तिखट,मीठ,हळद,धने पावडर, जीरे पावडर,मीठ,तीळ ओवा टाकावे आणि गोळा मळून घ्यावा. आणि अर्धा तास बाजुला ठेवावे.
- 4
कणकेचा गोळा करावा आणि ठेपला लाटून घ्यावा.
- 5
ठेपला तव्यावर दोन्ही बाजूने तव्यावर तेल टाकून कुरकुरीत भाजून घ्यावा.
- 6
अश्या प्रकारे सर्व ठेपले करून घ्यावे. गरम गरम ठेपले दही आणि चटणी सोबत सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या