दुधी भोपळ्याच्या किसाची भाजी (dudhi bhopalyachi khisachi bhaj recipein marathi)

दुधी भोपळ्याच्या किसाची भाजी (dudhi bhopalyachi khisachi bhaj recipein marathi)
कुकिंग सूचना
- 1
दुधी भोपळा स्वतचं धुवून घ्यावा. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावी. किसलेल्या दुधी भोपळ्याचे दोन कप करून घ्यावे.
- 2
दुधी भोपळा किसून घ्यावा. दुधी भोपळा किसून घेतल्यावर पाणी काढून घ्यावे.
- 3
भाजी साठी लागणारे कांदा,टोमॅटो, हिरवी मिरची चिरून घ्यावी.कढई मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर थोडे जीरे टाकावी.मग कांदा आणि मिरची टाकावी.
- 4
कांदा सोनेरी झाल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा.कांदा आणि टोमॅटो एकजीव झाल्यावर तिखट,मीठ,हळद,धने पावडर,जीरे पावडर टाकावे. आणि वरील सर्व मिश्रण एकत्र करावे.
- 5
वरील सर्व मिश्रणामध्ये बारीक किसलेले दुधी भोपळ्याचा कीस टाकावा. कढई मध्ये झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवावे व दुधी भोपळ्याची भाजी पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी. दुधी भोपळ्याच्या कीसाची भाजी लवकर शिजते. त्या नंतर आमचूर पावडर टाकावे आणि पाच मिनिटे भाजी शिजू द्यावी. आणि गॅस बंद करावा.
- 6
दुधी भोपळ्याच्या किसची भाजी लवकर शिजते.पचायला हलकी असते. भाजी सर्व्हिंग बाउल मध्ये काढावी आणि कोथिंबीर पेरावी. दुधी भोपळ्याच्या किसाचू भाजी चपाती,पराठा आणि दह्या सोबत छान लागतं
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या