मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)

rucha dachewar @cook_26177680
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पातीचा कांदा,गाजर,हिरवी मिरची,कोथिंबीर,टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.कणीक,बेसन,तांदळाचे पीठ एका भांड्या मध्ये काढून घ्यावे.
- 2
पीठामध्ये तीळ,ओवा,जीरे पावडर,तिखट,मीठ,तीळ,ओवा,मीठ,धने पावडर टाकावे.
- 3
पीठ मिक्सर मधून किंवा चमच्याने एकजीव करून घ्यावे. मिक्सर मधून एकजीव केलेल्या पीठामध्ये चिरलेल्या भाज्या टाकाव्यात.
- 4
भाज्या टाकल्यावर मिश्रण एकजीव करावे.नॉन स्टिक तवा गॅस वर ठेवावा. तव्याला चारी बाजूने किंचित तेल टाकावे.
- 5
एका गोल पळीने चिला नॉन स्टिक तव्यावर पसरवावा.दोन्ही बाजूने चिला परतवून घ्यावा.
- 6
चिला दोन्ही बाजूने कुरकुरीत झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घ्यावा. अश्या प्रकारे सर्व्ह चीले करून घ्यावे.
- 7
गरमा गरम मिश्र पिठाचे पौष्टिक चिले लोणच्या सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14581453
















टिप्पण्या (2)