रवा डोसा (rava dosa recipe in marathi)

#GA4 #week25 # रवा डोसा
की वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे.

कुकिंग सूचना
- 1
रवा आणि दही एका भंड्या मध्ये छान मिक्स करावे आणि अर्धा तास बाजुला ठेवावे. मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यावे.
- 2
जीरे,हिरवी मिरची, कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करून घ्यावे.त्या मध्ये थोडे तांदळाचे पीठ टाकावे आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे.आणि डोसा करताना वेळेवर खाण्याचा सोडा टाकावा.
- 3
नॉन स्टीक तवा गरम करायला ठेवावा. तवा गरम झाल्यावर रवा डोस्याचे पीठ पळीने पॅनवर टाकावे.आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजावा
- 4
डोसे कुरकुरीत झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावे.
- 5
अश्या प्रकारे सर्व डोसे करून घ्यावे. आणि दलियाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या