लसणाचे लोणचे.. (lasnache lonche recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week24 की वर्ड--Garlic
लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !! आहार हेच औषध या पुस्तकात लसणाचे वर्णन अमृताचा थेंब म्हणून केला आहे. समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले ..अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला.
तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला..गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा हा एकमेव कंद आहे .तर असा हा पंचरसयुक्त लसूण..आणि प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे. लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत.म्हणूनच जसे अमृताने अमरत्व प्राप्त होते..तसेच हा लसूण कित्येक रोगांपासून आपलं संरक्षक कवच बनून संरक्षण करतो..म्हणजे एक प्रकारे अमरत्वच बहाल करतो आपल्याला..
लसूण खाता मधुमेह चरबी पळे लांब लांब
हृदयरोग,मूत्रविकारही राहती दोन हात लांब..
कच्चा लसूण खावा.. सकाळी अनशापोटी एक लसूण खाऊन त्यावर पाणी प्यायले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते..पण तो अतिशय उष्ण,तीक्ष्ण असतो तसेच तोंडाला उग्र वास ही येतो म्हणून घरी सगळे लसूण खायला नको म्हणतात..पण तोच लसूण शिजवला की गोडसर होतो चवीला..म्हणून मग मी या लसणाच्या लोणच्याचा घाट घातलाय..😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20मिनीटे
4जणांना
  1. 1 कपलसूण
  2. 1 टेबलस्पूनबडीशेप
  3. 2 टेबलस्पूनमेथीदाणे
  4. 3 टेबलस्पूनमोहरी
  5. 1/2 कपतेल
  6. 1/2 टी स्पूनहिंग
  7. 1 टेबलस्पूनकलोंजी
  8. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  11. 2 टेबलस्पूनविनेगर ऑप्शनल

कुकिंग सूचना

15-20मिनीटे
  1. 1

    प्रथम लसूण सोलून घ्यावा आणि मोठ्या पाकळ्यांचे दोन उभे तुकडे करून घ्यावे.

  2. 2

    एका कढईत प्रथम बडीशेप मेथी काळी मोहरी मंद गॅस वर सावकाश भाजून घ्यावे.बदलेपर्यंत आणि मोहरी किंचित तडतडू लागेल इतपर्यंत भाजावे. नंतर गॅस बंद करावा आणि हे मिश्रण दोन ते तीन मिनिटे परतत राहावे दुसऱ्या वाडग्यात काढून घेणे.. आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून जरासे जाडसर वाटून करून घेणे. बारीक वाटू नये.

  3. 3

    आता एका कढईत तेल घालून तापवा.. आणि त्यामध्ये हिंग घाला कलौंजी घाला आणि यामध्ये लसूण घालून थोडे परतून घ्या हे सगळे मंद आचेवरच करावे नाहीतर जळून जाईल आणि या लसणाचा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे

  4. 4

    नंतर यामध्ये बारीक वाटलेला मसाला तिखट हळद आणि मीठ घालून लोणचे व्यवस्थित परतावे नंतर गॅस बंद करावा आणि यामध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थित ढवळावे. आणि विनेगर घालून लोणचे नीट मिक्स करावे..एक लक्षात ठेवा की लोणच्यावर एक बोट तेल तरी कायम राहिले पाहिजे म्हणजे लोणचे 1-2महिने टिकेल..

  5. 5

    तयार झालेले चमचमीत लसणाचे लोणचे तुम्ही पोळी भात भाकरी या कशा बरोबरही तोंडी लावणे म्हणून सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes