दह्यातली भेंडी (dahyatil bhendi recipe in marathi)

#भेंडी
ही भाजी माझी आई नेहमी बनवते. आज त्या भाजीत थोडासा बदल करून बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
दह्यातली भेंडी (dahyatil bhendi recipe in marathi)
#भेंडी
ही भाजी माझी आई नेहमी बनवते. आज त्या भाजीत थोडासा बदल करून बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे.
आता कढईमध्ये तेल घेऊन त्यात लसूण, आले व कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यावा. आणि थंड करून घ्यावा. त्याच कढईमध्ये भेंडी व थोडे मीठ घालून छान फ्राय करून घ्यावे व एका प्लेटमध्ये काढून घ्यावी. - 2
आले, लसूण व कांद्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
दही व्यवस्थित फेटून घ्यावे.
आता सेम कढईत थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, जीरे व मेथी घालावी. छान तडतडली की त्यात आले, लसूण व कांद्याची पेस्ट घालावी.मिश्रण नीट परतवून घ्यावे. - 3
परतवलेल्या मिश्रणात हळद, लाल मिरची पूड, धणे पूड घालून एकजीव करून घ्यावे. त्यात भिजवलेले बेसन घालावे. (बेसन घातल्याने दही फाटत नाही व भाजी दाटसरपणा येतो.) मिश्रणाला छान तेल सुटेपर्यंत परतवावे. आता त्यात दही घालून मिक्स करावे.
- 4
मिश्रणाला थोडी कड आल्यावर त्यात फ्राय केलेली भेंडी घालावीत. चवीनुसार मीठ घालावे व आवश्यकतेनुसार पाणी घालावे. भाजीला एक उकळी आल्यानंतर कोथिंबीरीने गार्निश करून गरमागरम दह्यातली भेंडी सर्व्ह करावी.
चपाती किंवा भाताबरोबर खायला अतिशय चविष्ट लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या