मटण (mutton recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटण स्वच्छ धूऊन घ्यावे
- 2
नंतर आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ची पेस्ट करून कांदा कापून मटण मध्ये टाकावी त्यात थोडी हळद आणि मीठ पण टाकावं आणि शिजायला ठेवावे
- 3
नंतर कांदा व सुक खोबर गॅस वर भाजून घ्यावे
- 4
धने,जीरे,कलमी,कर्ण फुल, काजु,भेंडी विलायची,तेजपान हे सगळं तव्यावर भाजून घ्यावे
- 5
थंड झालं की मिक्सर मधून बारीक करावे
- 6
एक कढईत तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला टाकून तेल सुटे पर्यंत होऊ द्यावे
- 7
नंतर त्यात हळद,तिखट,कसुरी मेथी,गरम मसाला टाकून होऊ द्यावे
- 8
तयार झालेल्या मसाल्यात शिजलेले मटण टाकावे आणि 10 मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे
- 9
नंतर त्यात आवश्यकते नुसार पाणी आणि मीठ घालावे वरून कोथिंबीर घालावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14732881
















टिप्पण्या