सुकट आणि तांदळाची भाकरी (sukat ani tandalachi bhakhri recipe in marathi)

#KS1
#सुकट आणि तांदळाची भाकरी
कोकण म्हंटलं डोळ्यासमोर येतो तिथला नयनरम्य निसर्ग, समुद्र, नारळ - पोफळीच्या बागा, आंबट गोड रानमेवा, काजू,फणस,ताडगोळे, समुद्रातील विविध प्रकारची मासळी....आणि हो फळांचा राजा...आंबाही चाखावा तो कोकणातलाच . जगभरात त्याला खूप मोठी मागणी .आणि याबरोबरच येथील खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध...जेवणात भात आणि मासे यांना प्राधान्य. मासळीचे असंख्यप्रकार खावेत ते इथेच. म्हणूनच बऱ्याचदा लोक कोकणात सहलीला जावून मासळीचा मनमुराद आनंद लुटतात. तसेच व्हेज जेवणामध्येही भरपूर व्हरायटी असते. सोलकढी या जेवणात असलीच पाहिजे. तांदळाचे मोदक, वालाचे बिरडे,पोहा, नाचणीचे पापड काळ्या वाटाण्याची ऊसळ शिवाय नाश्त्यामध्ये पोहे, आंबोळ्या असे नानाविध प्रकार... मासळीमध्ये ओल्या मासळीबरोबरच सुकी मासळीही तितकीच अप्रतिम.. आज म्हणूनच मी तुमच्यासाठी घेवून आले आहे सुकट आणि तांदळाची भाकरी.. कोकण!! अर्थातच भात हे महत्वाचे पिक. त्यामुळे भाकरीही तांदळाचीच....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुकट स्वच्छ करून घ्यावी. कढईमध्ये कोरडीच भाजून घ्यावी.
- 2
कांदा,टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. कढई गरम करून त्यामध्ये ३ पळ्या तेल घालावे. तापले की हिंग, जीरे घालावे. तडतडले की कांदा घालावा, मीठ घालावे. झाकण ठेवून छान भाजून घ्यावा.
- 3
आता टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत भाजून घ्यावे. नंतर कांदा लसूण मसाला घालावा. सुकट पाण्यामध्ये धुवून मग घालावी. झाकण ठेवून एक वाफ आणावी. मग थोडे पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यावी.
- 4
व्यवस्थित शिजली की वरून कोथिंबीर घालून सजवावी.
- 5
तांदळाचे थोडे पीठ घेवून त्यामध्ये थोडे गरम पाणी घालून नेहमीप्रमाणे भाकरीचे पीठ मळावे. व भाकरी थापून भाजून घ्यावी.
- 6
आता गरम गरम सुकट या गरम भाकरीबरोबर सर्व्ह करावी. खूपच छान असा हा थोडा वेगळा असा आपल्याही आहारात बदल होतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या