सोप्पे टोमॅटो सूप (Tomato soup recipe in Marathi)

#soup
सध्याच्या कोरोना काळात तर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी आपण आहारात दररोज टोमॅटोचा सूप घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. टोमॅटोची गणना नेहमीच स्वादिष्ट भाज्यांमध्ये केली जाते. टोमॅटो स्वादिष्ट असण्याबरोबरच आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे.
आणि म्हणूनच टोमॅटोचा सूप अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे रेसिपी मध्ये दिलेले आहे.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो कुकरमध्ये उकडून घ्यावेत त्यानंतर त्याचे साल काढून त्याची मिक्सर मधून त्याची प्युरी करून घ्यावी. गॅसवर एका पातेल्यामध्ये तूप घेऊन ते तापल्यानंतर त्यामध्ये जीरे घालावे चांगले फुलू द्यावे.
- 2
त्यानंतर त्यात चिमूटभर हिंग कढीपत्त्याची पाने आणि आलं-लसूण पेस्ट घालावी. तयार टोमॅटोची प्युरी त्यात घालावी आणि तिखट, हळद, धने पावडर, मिरपूड,चवीनुसार मीठ घालावे व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- 3
पाच ते सात मिनिटे मिश्रण संपूर्ण उकळू द्यावे त्यानंतर कोथिंबीर घालून गार्निश करावे. गरमागरम टोमॅटो सूप तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या