दाल ढोकळी (चकोल्या) (dal dhokli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीपुरतं मीठ,तेल आणि ओवा घालून चांगले मिक्स करून घ्यावे आणि पीठ मळून घ्यावे आणि पंधरा वीस मिनिटे झाकून बाजूला ठेवावे.
- 2
तूर डाळ स्वच्छ धुऊन त्यात हिंग आणि हळद घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी
- 3
लसून पाकळ्या जीरे आणि खोबरे मिक्सरमधून वाटून घ्यावे
- 4
आता एका पातेल्यात तेल घेऊन त्यात फोडणी करून मिक्सरवर वाटलेले जीरे खोबरे आणि लसूण त्यात घालावे, त्यात थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून शिजवलेले वरण घालून आमटी करावी.
- 5
मग आपण जी बाजूला कणिक मळून ठेवली होती तिची पोळी लाटून त्या पोळीवर कात्रण फिरवून शंकरपाळ्या सारखी कापून घ्यावे.
- 6
सगळे कापून घेतल्या नंतर परत गॅस लावावा आणि त्या आमटी मध्ये एकेक करून असे सगळे कापून घेतलेले शंकरपाळी सोडावीत.
- 7
शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवून चांगल्या वाफा आणाव्यात.
- 8
शिजण्यासाठी चार-पाच दणकून वाफा आणल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालावी आणि एक चमचा साजूक तुप घालावे आणि सादर करावे
- 9
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या