मेरवान मावा केक (mawa cake recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#AsahiKaseiIndia
#बेकिंग
#मेरवान मावा केक
आज मी मावा न वापरता पण माव्यात जे घटक असतात ते म्हणजे बटर, तेल, मिल्क पावडर वेगवेगळे वापरून माव्याचा मेरवान केक बनविला आहे चव अगदी परिपूर्ण मेरवानकडे मिळतो त्याच मावा केकची.... एकदा तरी करून बघाच आणि सांगा.... कसा झालाय ते....हा फक्त साहित्य जे दिलंय तेच आणि त्याच प्रमाणातच वापरा आणि बघा.... मेरवानचा मावा केक घरच्या घरी

मेरवान मावा केक (mawa cake recipe in marathi)

#AsahiKaseiIndia
#बेकिंग
#मेरवान मावा केक
आज मी मावा न वापरता पण माव्यात जे घटक असतात ते म्हणजे बटर, तेल, मिल्क पावडर वेगवेगळे वापरून माव्याचा मेरवान केक बनविला आहे चव अगदी परिपूर्ण मेरवानकडे मिळतो त्याच मावा केकची.... एकदा तरी करून बघाच आणि सांगा.... कसा झालाय ते....हा फक्त साहित्य जे दिलंय तेच आणि त्याच प्रमाणातच वापरा आणि बघा.... मेरवानचा मावा केक घरच्या घरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
६ जण
  1. प्रमाण १ कप - २०० मिली
  2. 1/2 कपजाडा रवा
  3. 1/2 कपआंबट दही
  4. 1 कपमैदा
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. चिमूटभरमीठ
  8. 1/2 कपपेक्षा थोडं कमी मिल्क पावडर
  9. 1/4 कपकॉर्नफ्लोर
  10. 1/4 कपबटर
  11. 1/4 कपतेल
  12. 3/4 कपबारीक साखर
  13. 2अंडी
  14. १-१/२ टीस्पून व्हॅनिला एस्सेन्स

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    प्रथम बाउल मध्ये जाडा रवा व दही घालून मिक्स करून झाकून रात्रभर किंवा ५ तास ठेवा म्हणजे ते मिश्रण छान फरमेंट झालेलं दिसेल. (किंवा ५ तासानंतर ते मिश्रण फ्रीझमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी केक केला तरी चालेल)

  2. 2

    चाळणीत सर्व ड्राय मिश्रण म्हणजेच मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोर सर्व ४ वेळा चाळून घ्या.

  3. 3

    बाउल मध्ये बटर (room temperature) वरचं हवं आणि तेल घालून फेटून घ्या नंतर त्यात शक्यतो बारीक साखर (पीठीसाखर सुद्धा चालेल) घालून फेटा. आता त्यात एकेक अंड फोडून व व्हॅनिला एस्सेन्स घालून फेटून घ्या.

  4. 4

    आता त्यात दह्यात भिजवलेला रवा (जर मिश्रणाला पाणी सुटलं असेल तर वरचेवर ओतून टाका) घालून फेटा. नंतर चाळलेलं मैद्याचं मिश्रण थोडं थोडं घालून एकाच बाजूने मिक्स करा. मायक्रोवेव्ह १८० डिग्री सेल्सिअस ला १० मिनिटे प्रिहिट करायला ठेवा.

  5. 5

    कप केक मोल्डमध्ये Asahi Kasei India कंपनीचा बटर पेपर लावून घ्या व त्यात हे मिश्रण चमच्याने घाला वरून पिस्त्याचे काप घाला, टॅप करा. प्रिहिट मायक्रोवेव्ह मध्ये सर्व मोल्ड ठेवून २५- ३० मिनिटे बेक करा. बेक झाल्यावर बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. तयार आहे मेरवान मावा केक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes