लग्नाच्या पंगतीतील डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पालक,कांदा,टोमॅटो, बारीक चिरून घेतला. डाळ स्वच्छ धुऊन घेतली. आणि कुकर मध्ये तीन शिट्या लावून पालक आणि डाळ शिजवायला ठेवली.
- 2
डाळ पालक शिजल्यानंतर, एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यानंतर मोहरी,मेथी, जिर, ठेचलेला लसूण,कढीपत्ता हिंग, कांदा,टोमॅटो, आले लसणाची पेस्ट घालून फोडणी घातली.
- 3
नंतर हळद, तिखट, जीरे धने पावडर, गरम मसाला शेंगदाणे प्रमाणात मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवू दिला. तेल सुटायला लागला नंतर त्यामध्ये पालकाची डाळ घातली आणि मिक्स करून उकळू दिली. त्यामध्ये गूळ आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करून केली.
- 4
जीरे,मोहरी,कढीपत्ता, लाल मिरच्या घालून तडका तयार केला. आणि डाळ भाजी सर्व्ह करताना वरून तडका घातला. तयार आहे आपली लग्नाच्या पंगतीतील गरमागरम तडके वाली डाळ भाजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15156178















टिप्पण्या