काजू म्हैसूरपाक (kaju maysore pak recipe in marathi)

#cpm6
# उपवास रेसीपी
काजू म्हैसूरपाक (kaju maysore pak recipe in marathi)
#cpm6
# उपवास रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
काजू थोडे गरम करून घ्यावे.थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यावे,त्यातच डेसिकेटेड कोकोनट व विलायची पुड पण फीरवून एकजीव करून घ्यावे..काजू व डेसीकेटेड कोकोनटच्या मिश्रणमधे गरम पाणी घालून पेस्ट करून घ्यायची. जाड बुडाच्या कढईत साखर घालून त्यामध्ये काजूची पेस्ट मिक्स करायची.कढई गॅसवर ठेवून हाय फ्लेमवर सतत ढवळायचे.एकीकडे तुप गरम करायला ठेवायचे.
- 2
तुप कडकडीत गरम हवे..कढईतील मिश्रण साखर विरघळून पांढरे व्हायला लागेल..थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे तुप घालावे.थोड्याच वेळात मिश्रण कडेला तुप सोडायला लागेल.लगेच ते मिश्रण तुप लावलेल्या ट्रे मध्ये ओतायचे.वरून ड्रायफ्रूटचे काप आवडीप्रमाणे घालायचे.
- 3
या सगळ्या क्रीया खूप झटपट व्हायला पाहीजे..मिश्रणावर लगेच काप पाडून घ्यायचे कारण हे मिश्रण लगेचच कडक होते.मिश्रण कोमट असतांनाच वड्या काढून घ्यायच्या व गरमच डब्यात भरून ठेवायचे, एकदम फॅनखाली वगैरे थंड करू नये..आपोआप हळूहळू थंड होवू द्यायचे.
- 4
आपला उपवासाचा काजूचा म्हैसुरपाक तयार आहे..आज अंगारकी संकष्टी आहे,त्यानिमित्त्य "गणपती बाप्पाला"नैवेद्य म्हणून बनवला.
चवीला अतिशय सुंदर व तोंडात सहज विरघळणारा असा हा म्हैसुरपाक आहे..जरूर करुन बघा.
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या (2)