चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बासमती तांदूळ धूवून घ्यायचे.पाण्यात भिजत ठेवावे..चिकन स्वच्छ धूवून निथळून घ्यावे.आता दह्यामध्ये मीठ,लाल तिखट,हळद,गरम मसाला,लसूण पेस्ट,कोथिंबीर घालून त्यामध्ये चिकन मिक्स करून मॅरिनेट करून घ्यावे
- 2
मसाला:-कांदे चिरून भाजून घ्यायचे,खसखस खोबरे भाजून घ्यायचे.मिक्सीमध्ये कांदे,खसखस,खोबरे,टोमॅटो चिरून,5 काजू,लसूण,अद्रक,हीरवी वेलची,मसालावेलची बारीक करून घ्यायचे.
- 3
पाण्यामध्ये एक चमचा साजूक तुप,,मीठ,मसाला वेलची,हीरवी वेलची,दालचिनी,मिरे घालून उकळी आल्यावर तांदूळ घालून मोकळा भात शिजवून घ्यायचा व त्यामध्ये बिर्याणी मसाला मिक्स करून घ्यावा.काजू व बदाम तुपात तळून घ्यायचे..पॅन मध्ये तुपाची फोडणी करून जीरे,तेजपत्ता, वाटलेला मसाला,हळद,लाल तिखट,गरम मसाला घालून छान भाजून घ्यायचे.
- 4
त्यात दह्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे,मीठ घालावे,छान परतून थोडे पाणी घालून चिकन शिजवून घ्यावे..एका भांड्यामध्ये भरपूर साजूक तुप घालून भात घालावा,नंतर चिकनचा लेयर देवून तळलेले काजू बदाम व तळलेला कांदा टाकावा व कोथिंबीर टाकावी नंतर पुन्हा भात टाकावा व चिकनचा लेयर रिपीट करावे.व छान वाफ आणायची.
- 5
सगळ्यात शेवटी वरून काजू बदाम व तळलेल्या कांद्याने डेकोरेशन करावे.
आपला टेस्टी चिकन पुलाव तयार आहे.थोडा रस्सा व दहीकांद्या सोबत सर्व्ह करावा....
Keywords
Similar Recipes
More Recipes







टिप्पण्या