मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
6_7 सर्व्हिंग
  1. 1 कपतांदुळ जाड (कुठलाही)
  2. 1/2 कपचनाडाळ
  3. 1/2 कपउडीद डाळ
  4. 1/2 कपमुग डाळ
  5. 1/2 कपमसूर डाळ
  6. 2 टीस्पूनमीठ
  7. 2 टेबलस्पूनसाखर
  8. 3/4 कपपोहे
  9. 4-5 हिरव्या मिरच्या आवडीने तिखट कमी अधिक करू शकता
  10. 6-7 लसूण कळ्या
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1 टेबलस्पूनमोहरी
  13. 1 टेबलस्पूनजीरे
  14. 1 टेबलस्पूनतीळ
  15. 1/2 टीस्पूनहिंग
  16. 10-12 कढीपत्ता पानं
  17. 5-6तळण्यासाठी हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    तांदुळ व सगळ्या डिळी स्वच्छ धुवुन (दोन ते तीन पाण्याने) घ्या. पाच ते सहा तास भिजवुन घ्या.

  2. 2

    आता मिक्सरमधून तांदुळ व डाळी बारीक वाटून घ्या. पोहे स्वच्छ करून ते धुवुन डाळ व तांदुळ या बरोबर वाटून घ्या.त्यात एक टी स्पून मीठ घालून घ्या.

  3. 3

    रात्रभर हे मिश्रण फर्मंट करून घ्या. दुसय्रा दिवशी त्यात पुन्हा एक टी स्पून मीठ घालून घ्या. मिरच्या व लसूण भरड करून घाला.ढोकळा पात्राला तेल लावून घ्या.

  4. 4

    कढईत पाणी घालून उकळायला ठेवा ढोकळा पात्रात मिश्रण ओतून घ्या. कढईत स्टॅड ठेवून त्यावर पात्र ठेवा. झाकण ठेवून पंधरा मिनिट वाफवून घ्या.

  5. 5

    ढोकळा नार्मल टेंप्रेचरला आले की तडका घालून घ्या.कढल्यात तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि त्यात तीळ घाला कढीपत्ता घालून घ्या मिरच्या घाला परतून घ्या हिंग घालून घ्या. तडका ढोकळ्यावर पसरवून घ्या.

  6. 6

    चटणी किंवा मिरच्या बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes