रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (restaurant style dal khichdi recipe in marathi)

डाळ आणि तांदूळ आगोदर शिजवून ठेवला कि खूप लवकर तयार होतो ही खिचडी. खायच्या वेळेस फोडणी देऊन लगेच गरमागरम डाळ खिचडी खाऊ शकता.
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (restaurant style dal khichdi recipe in marathi)
डाळ आणि तांदूळ आगोदर शिजवून ठेवला कि खूप लवकर तयार होतो ही खिचडी. खायच्या वेळेस फोडणी देऊन लगेच गरमागरम डाळ खिचडी खाऊ शकता.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरडाळ, मुगडाळ स्वच्छ धुवून हळद,मीठ पाणी घालून शिजवून घ्यावे.
- 2
तांदूळ ही स्वच्छ धुवून मीठ आणि पाणी घालून शिजवून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, कडीपत्ता, आद्रक, लसूण, हिरवी मिरची घालून परतून घ्या. कांदा घालून छान परतून घ्या.टोमॅटो घालून परतावे.
- 4
धणे जीरे पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी घालून तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर शिजवलेली डाळ घालावी.
- 5
नंतर पाणी घालून मिक्स करा. (खिचडी किती पातळ किंवा घट्ट हवी त्या नुसार पाणी घालवी) तयार भात घालून मिक्स करावे. (भात आणि डाळी मध्ये मीठ घातले आहे त्यामुळे गरज आसेल तर थोडे मीठ घालावे.)
- 6
दहा मिनिटे खिचडी शिजवून घ्यावी.
- 7
गरमागरम खिचडी वरतून तुप घालून सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
- पाकातले लहान आवळे (pataktle lahan awale recipe in marathi)
- उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामून (upwasache ratalyache gulab jamun recipe in marathi)
- उपवासाचे रताळ्याचे गुलाब जामून (ratalyache gulab jamun recipe in marathi)
- सफरचंदाचा ज्यूस (sarfarchandacha Juice recipe in marathi)























टिप्पण्या (2)